राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल असून जळगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या मतदारसंघात भाजपमधून अनेक चेहरे संधी मिळावी म्हणून पुढे आले आहेत.. मात्र यात विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव निश्चित मानले जात असल्याचे सागर बंगल्यातील विश्वसनीय सूत्रांकडून समोर आले आहे.
भारतीय जनता पार्टीतून चार वेळा महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या राजू मामा भोळे यांना भाजपने जळगाव विधानसभेत दोन वेळा उमेदवारीची संधी दिली होती.यामध्ये त्यांनी दोन वेळा आमदारकी भूषवत आता आगामी विधानसभेत तिसऱ्यांदा आमदारकी लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली होती..त्यानुसार त्यांचे तिकीट निवडणूक आयोगाच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पहिल्याच यादीत जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
. जळगाव विधानसभेसाठी संधी मिळावी म्हणून भाजपमधून अनेक चेहरे पुढे आले होते. यामध्ये रोहित निकम, सुनील भंगाळे, अश्विन सोनवणे , सुनील खडके, आबा कापसे , अविनाश पाटील अशा इच्छुकांची नावे जळगाव विधानसभेसाठी चर्चेत होती. संधी मिळाल्यास आम्हीही जळगाव विधानसभा लढवणार असे दावे – प्रति – दावे करण्यात येत होते. मात्र राजू मामा भोळे यांचे नाव पुन्हा एकदा विधानसभेच्या उमेदवारी निमित्ताने पुढे आले समजल्याने इच्छुकांची काहीशी नाराजी झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात भाजप मधून अंतर्गत विरोध झाल्याचा पाहायला मिळाले आहे. मात्र पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयापुढे इच्छुकांची देखील कोंडी झाली आहे.
आगामी विधानसभेसाठी पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यामुळे इच्छुकांच्या उमेदवारीसह मतांवर पाणी फेरले आहे. यामध्ये भाजपा अंतर्गत नाराजीचा फटका देखील बसण्याची दाट शक्यता आहे..नाराज इच्छुक उमेदवारांना मनवण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यापुढे असणार आहे.
गेल्या ..लोकसभेमध्ये अनेक विद्यमान खासदारांची तिकीट कापली गेल्याने त्याचा फटका लोकसभेच्या निकालावर बसल्याचा अंदाज भाजप पक्षश्रेष्ठींना आहे त्या अनुषंगाने भाजपने पुन्हा एकदा आमदार भोळे यांना संधी देत तिसऱ्यांदा मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार नेमकं आमदार भोळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय पवित्र घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचा ठरणार आहे.