राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या..यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजला असून 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान यावरून निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाची मागणी मान्य केल्याचे दिसून येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांचा फटका बसू नये यासाठी आधीचं राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी केली होती. कारण सुट्टीच्या दिवशी मतदार बाहेर जाऊ शकतात त्यामुळे मतदानाच्या टक्कवारीवर परिणाम होतो… या सर्वांशी मागणी लक्षात घेता निवडणूक आयोगाने बुधवारी मतदान ठेवला आहे. दरम्यान या सगळ्यांमध्ये मतदारांची टक्केवारी वाढून महायुतीसह महाविकास आघाडीला याचा फायदा होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
या मतदानावेळी ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. अशी माहिती सांगण्यात आली..