राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.. दरम्यान आज विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शंखनाद अशी पोस्ट केली आहे. यासोबत फडणवीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला… https://t.co/j4nAq2CTM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. महाराष्ट्रात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी आहे, तर महिला मतदारांची संख्या ४.६६ कोटी आहे. तरुण मतदार १.८५ कोटी आहेत. तर २९.९३ लाख नवीन मतदार आहेत. असे एकूण राज्यात ९.३५ कोटी मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत.