नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शेतात काम करणाऱ्या उशाबाई कोळी वय ४५ या महिलेवर हत्याराने वार करून तिला ठार मारण्यात आले आहे. या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दिवसा ढवळ्या एका महिलेची हत्या करून गुन्हेगारांनी पोलिस प्रशासनसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी दादा कोळी , भास्कर कुवर , घारू कोळी, कमलेश कोळी, सागर चित्ते, जयेश चित्ते, अर्जुन शिरसाठ, शुभम चित्ते, निलेश कोळी, गणेश कोळी, गोपाल कोळी, मयुर कोळी, जिवन कोळी, कुलदीप कोळी, सचिव कोळी, सागर कोळी, रविदास कोळी, श्रीकांत कोळी, विशाल कोळी, दादाभाई कोळी, रूषिकेश सोनवणे, गणेश कोळी, आदी उपस्थित होते.