राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे.. नुकतीच शहरातील शिवाजीनगर येथे राहणारे अति ज्येष्ठ नागरिक गोदावरी पंडित पाटील यांच्या घरी चोरी झाली.. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे,गणेश वाघमारे, अतुल वंजारी,संजय हिवरकर,हरिलाल पाटील विजय पाटील, रवी नरवाडे,राजेश मेढे,प्रदीप सपकाळे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून देण्यात आले..
या चोरीच्या गुन्ह्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आवडे यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी जळगाव शहरातील बळीराम पेठ भागात चोरीचे सोने घेऊन विक्रीचे उद्देशाने संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली..त्यानंतर या पथकाने सापळा रचून सफू अतुल वंजारी यांनी आरोपी योगेश संतोष पाटील याची अंगझडती घेतली.. त्यानंतर त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिवळ्या रंगाचे धातूचे दागिने मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.. त्यानंतर त्या दागिन्यांची तपासणी करून तसेच शुद्धता वजन प्रमाणपत्राची मागणी त्यांनी दुकानात जाऊन केली.. त्यानंतर योगेश पाटील यांच्याकडून सर्व चोरीचा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे,गणेश वाघमारे, अतुल वंजारी,संजय हिवरकर,हरिलाल पाटील विजय पाटील, रवी नरवाडे,राजेश मेढे,प्रदीप सपकाळे यांनी केली.. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिवाजी शिखरे करत आहेत.