राजमुद्रा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असूनआयोगाने 13 राज्यांतील 47 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसने केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना तिकीट दिले आहे. प्रियांका गांधी यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असून त्या वायनाडचा गड राखणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
.
केरळमध्ये विधानसभेच्या दोन जागावर ही पोटनिवडणूक होत आहे.. यासाठी पक्षाने दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत…. दरम्यान2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी यूपीच्या वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपारिक जागा निवडली होती आणि वायनाड सोडले होते. त्यानंतर आता प्रियंका गांधी पुढील महिन्यात वाय नाड लोकसभा पोटनिवडणूक लढवतील आणि केरळमधील मतदारसंघातून निवडणुकित पदार्पण करतील..
दरम्यान याआधी प्रियांका म्हणाल्या होत्या की, वायनाडचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होईल. त्यांची (राहुल गांधी) अनुपस्थिती मी त्यांना जाणवू देणार नाही. मी मेहनत करीन. प्रत्येकाला खूश करण्याचा आणि चांगला प्रतिनिधी होण्याचा माझा प्रयत्न असेल. दरम्यान काही काळापासून निवडणूक लढविण्यास पुस्तकअसलेल्या प्रियंका गांधी यांचे हे निवडणुकीतील पदार्पण असणार आहे.