राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच काल राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला… यावेळी महायुतीच्या सातही आमदारांनी शपथ घेतली..यावरून आता आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीवर हल्लाबोल चढवला आहे…महायुतीच्या सातही आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेबरोबरच राज्यपाल नियुक्त आमदारांच्यावर ही भाष्य केला आहे..काल सात जणांनी घेतलेली शपथ हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असताना आचारसंहिता जाहीर व्हायच्या. पाच- सहा तास आधी घेतलेल्या निर्णय घटनाबाह्य आहे. ज्या करण्यासाठी तुम्ही आमचे यादीत थांबविली या सात आमदारांच्या बाबतीत शपथ घेतली त्या संदर्भात राज्यपालांनी कुठली माहिती घेतली. त्यातील राजकीय कार्यकर्ते आहेत धर्मगुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खेळ भाजपच संपवणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.भाजपच्या लोकांना महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. प्रादेशीक अस्मितेचे पक्ष यांना तोडायचे आहेत. महाराष्ट्राची लूट करून त्याला त्याग म्हणणार का?, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.