(राजमुद्रा जळगाव) जळगाव जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पाळधी महामार्गावर सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ एरंडोल इथून एक वर्षाआधी चोरी केलेली मोटरसायकल आढळून आली.
अधिक माहिती अशी की पोलीस पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना प्रवीण संभाजी पाटील (वय 30) रा. ब्राह्मणे, ता. एरंडोल हा जिल्ह्यात दुचाकींची चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. आज रोजी (ता 7) स्थानिक गुन्हे शाखेकडून पारधी गावाजवळ महामार्गावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत एक टीव्हीएस मोटरसायकल व सागर सुभाष धनगर (वय 22) रा. निमगाव, ता. यावल हादेखील आढळून आला. सदर मोटरसायकल ही एक वर्षाआधी एरंडेल येथून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अधिक तपासात एरंडोल येथून एक व पारोळा येथून एक अशा अजून दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली चोरट्याकडून मिळाली आहे. सदर चोरट्यांना अधिक तपासासाठी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी विजय पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील, चालक राजेंद्र पवार, भरत पाटील यांचे पथक याकामी स्थापन केले होते.