राजमुद्रा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत ही पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात योगेंद्र पवार यांनी दंड थोपटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.. त्यामुळे काका विरुद्ध पुजण्या अशी लढत या विधानसभेत रंगणार आहे.
बारामती मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा रंगली होती. मात्र बारामतीमधून अजित पवार हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील हे पक्षाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. बारामतीमध्ये आम्ही आभार दौरा आणि स्वाभिमान यात्रा काढली त्यावेळी लोकांचा विश्वास दिसून आला. महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय असेल तो मान्य केला जाईल. आमच्यापर्यंत काही निरोप आलेला नाही. मात्र, निर्णय आपल्या सर्वांनाच लवकरच कळेल. बारामतीचा निर्णय शरद पवार साहेब घेतील. असेही रवींद्र पवार म्हणाले..त्यांनी पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद विरुद्द भावजय असा सामना रंगल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे अजित पवार गटाला दारुण पराभवाला समोर जावं लागलं होतं..त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला होता. लोकसभेला बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाल्यानंतर पुन्हा एकदा आता विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी टशन होणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.