राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच आता पक्षातील आमदारांच्या इनकमिंग आणि आउटगोइंगला सुरुवात झाली.. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे दोन आमदार लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच अजितदादांना मोठा धक्का बसणार आहे.अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या त्यांचा फोन नॉट रिचेबल असून दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे.त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.
नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.विशेष म्हणजे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे ते लवकरच तुतारी हाती घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसापासून महायुतीत अलबेल नसल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं.. काही दिवसांपूर्वीच महायुतीच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.सतीश चव्हाण यांनी अजित पवार किंवा महायुतीच्या नेत्यांचा संपर्क होऊ नये, म्हणून फोन बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ते आता शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.. त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.