राजमुद्रा : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच (Vidhan Sabha Election) बिगुल वाजलं असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.. महाराष्ट्रात एकाचं टप्प्यात मतदान होणार आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.. विरोधकांना जास्त वेळ मिळू नये या भीतीपोटी एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याची शिफारस सरकारने केली असल्याची टीका खडसे यांनी केली आहे.
आपल्या महाराष्ट्रात कधीच दोन टप्प्यात निवडणूक झाली नाही त्यामुळे त्यांच्या मनाला काही अर्थ नाही… आताच्या निवडणुका टप्प्याटप्प्या झाल्या तर विरोधकांना प्रचाराला अधिक वेळ मिळेल आणि सरकारच्या विरोधात वातावरण तयार होईल या भीतीपोटी सरकारने यावर्षी एका टप्प्यात निवडणूक घेतल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.मात्र याआधी ज्या चार-पाच ज्या निवडणुका झाल्या त्या एकाच टप्प्यात झाल्या.. त्यामुळे कोणी काही म्हणत असला तरी त्याला मला अर्थ वाटत नाही, असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुक्ताई नगरात राजकीय वारे वाहू लागले आहे..मी ही सहावी निवडणूक लढतो आहे… त्यापैकी फक्त एक वेळेस म्हणजे 1999 साली दोन टप्प्यात निवडणूक झाली होती…त्यानंतर आता होणारी निवडणूक ही एका टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात आपले दान टाकणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचली आहे.