राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे…. भाजपने आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच अवघ्या 45 मिनिटे आधी युतीच्या मित्रपक्षांना निमंत्रित न करता जळगावात अमृत पाणीपुरवठा योजनेच उद्घाटन केल आहे.. त्यामुळेविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना युतीतील मित्र पक्षांची नाराजी दिसून आली आहे. दरम्यान यास मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला चांगलाच धरलं असून हा कार्यक्रम निवड फक्त भाजपचाच होता का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे
.शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महायुतीचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वगळता मित्र पक्षांमधील कुणीही आलं नव्हतं. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदारांना निर्धार मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं. पण त्यांनी सर्वांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज गुलाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीत जळगावात 253 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यामुळे जळगावात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मला या कार्यक्रमासंदर्भात फोन आला होता मात्र आचारसंहिता लागणार असल्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरले असल्यामुळे मी त्यांना नकार दिला.. असे त्यांनी सांगितले. दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रमांत निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं अशी माहिती आहे. कार्यक्रमाला फक्त भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती