राजमुद्रा : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत . यामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीकडून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र भाजपकडून अंतिम यादी जाहीर होण्याला काही अवधी उरला आहे. यामध्ये धुळे विधानसभा मतदारसंघ अधिक चर्चेत आहे, कारण या मतदारसंघात भाजप गेम चेंजर खेळी खेळण्याच्या तयारीत आहे, विधानसभेसाठी भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या अनुप अग्रवाल यांना पहिली पसंती भाजप पक्षश्रेष्ठी यांच्याकडून देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे. अग्रवाल यांच्या संघटनात्मक कार्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या “गुड फेस” मध्ये आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुळे मतदार संघात एम आय एम पक्षाचे फारुक शहा हे निवडून आले होते. बंडखोरीच्या फटक्यामुळे महायुतीला ही जागा गमवावी लागली होती. आता कोणत्याही परिस्थितीत संघटनेच्या बळावर धुळे शहरात भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक ताकद लावताना दिसत आहे,
गेल्या काळात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार अनिल गोटे लोकसंग्राम गट विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला होता. भाजपाचे आमदार असताना अनिल गोटे अंतर्गत वादामुळे भाजपच्या विरोधात उभे टाकले गेले होते, महापालिका निवडणुकीमध्ये लोकसंग्रामच्या माध्यमातून भाजपा विरोधात गोटे यांनी उमेदवार दिले. मात्र पाहिजे ते यश माजी आमदार गोटे यांना मिळाले नाही, प्रभारी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचे नियुक्ती झाल्यानंतर महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात धुळे महापालिका निवडणुका लढवण्यात आल्या यामध्ये भाजपला सत्तेसह घवघवीत यश मिळाले.
महापालिका निवडणुकांमध्ये अनुप अग्रवाल यांनी संघटनात्मक व्युव्हरचना करत पक्षाला जोरदार यश मिळवून दिले, पाच वर्ष महापालिकेत सत्ता आबादीत ठेवत शहरात विविध विकास कामे वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून करून घेतली आहे. यामुळे अनुप अग्रवाल नेहमी चर्चेत राहिले, विधानसभा निवडणुकीसाठी ताकतीचा चेहरा म्हणून भाजपने व पक्षश्रेष्ठींनी अनुप अग्रवाल यांच्या नावालाच पसंती दिली आहे. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचेच नाव जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही तासांमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.