राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं असताना जळगाव मध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर टीका करणार आहे आणि शिवसेना शिवसेनेवर टीका करणार आहे.. मात्र या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांचे स्वप्नभंग होणार असून पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचा सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे..
दरम्यान ते पुढे म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतं किंवा कोणीही मित्रही नसतो राजकारणात अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर्गत होत असतं त्यामुळे निवडणूक ही खरोखर वेगळी ठरणार आहे..प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आमच्या सरकार येईल पण मला माहिती आहे की, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार..हे मी ठासून सांगतो कारण त्याचं कारण म्हणजे रखडलेले सिंचनचे प्रकल्प असतील वेगवेगळ्या योजना असतील त्या माध्यमातून झालेला विकास हा या सरकारने केला आहे..या सर्व गोष्टी पाहता जनता सरकारलाच निवडून देणार.. त्यामुळे समोरच्यांचा जे स्वप्न आहे ते भंग होणार आहे आणि पुन्हा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे
दरम्यान पोखरा योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यामध्ये 319 गावांचा पोखरा योजनेमध्ये समावेश झालेला आहे.. पाणीपुरवठा खाते माझ्याकडे असल्यामुळे जल पातळी वाढली त्याचा रिपोर्ट आम्ही केला.त्यामुळे डार्क झोनमध्ये आमची जी गाव आहेत ज्यांचा पोखरा योजनेमध्ये समावेश होत नाही.. त्यासाठी आपण शिफारस केली होती..400 गावांची शिफारस आपण केली होती जवळपास त्यापैकी 319 गावांना पोखरा योजनेत समावेश झाला आहे. या गावांना पोखरा योजनेच्या माध्यमातून मोठा लाभ होणार आहे.