राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल असून महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आल आहे.
अशातच आता उद्या विधानसभा निवडणुकीची भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.. मात्र या यादीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्यामुळे भाजप कोणा कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपकडून या निवडणुकीतही काही विद्यमान आमदारांना तिकीट दिलं जाणार नसल्याची चर्चा आहे. यामध्ये वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर यांचं देखील नाव आहे. त्यांच्याऐवजी संजय पांडे यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.भाजपचे घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार राम कदम यांचंदेखील तिकीट धोक्यात असल्याची चर्चा आहे.याशिवाय भाजपचे शीव-कोळीवाडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजप कोणाकोणाला संधी देणार याची उस्तुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचली आहे.
भाजपची दिल्लीत काल उमेदवार ठरवण्याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी काही आमदारांना डच्चू देण्याचा देखील निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. पक्षाकडून या मतदारसंघातून प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे..