राजमुद्रा : राज्यात विधानसभेबरोबरच रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक होणार आहे..काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे.मात्र खासदार झालेल्या वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्टला निधन झालं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. यानुसार येत्या २० नोव्हेंबरला नांदडेमध्ये विधानसभेसह लोकसभेसाठीही मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक संपूर्ण वेळापत्रक
निवडणूक अधिसूचना – २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
निकाल – २३ नोव्हेंबर २०२४