राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून महायुतीतील नेते जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या तयारीत असतानाच महायुतीतील एका पक्षाच्या नेत्याने दंड थोपाटले आहेत.
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढणार आहे. आता माघार नाहीच अशी गर्जना जानकर यांनी केली आहे.. त्यामुळे महायुतीलां विधानसभा निवडणुकी आधीच मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे…महाराष्ट्रच नव्हे तर झारखंडमधीलही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत. आमचा पक्ष दोन्ही विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे. असे जानकर यांनी ठणकावून सांगितले आहे..महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागेवर विधानसभा लढविणार असल्याची घोषणा केल्यावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि भूम परांडामध्ये प्रचंड जल्लोष केला. राष्ट्रीय समाज पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून अश्रूबा कोळेकर तर भुम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून नानासाहेब मदने यांची संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीला महादेव जानकर यांनी दिलेला फटका महायुती सर्वकाही अलबेला नसल्याचा दिसून आला आहे..
विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आम्ही जातीवर राजकारण करत नाही. आम्हाला या देशाचे मालक बनायचे आहे. आम्ही सर्व समाजाला घेऊन जाणार आहोत. आता आम्ही माघारी वळणार नाही. 288 जागा लढवणार म्हणजे लढवणारच, असं म्हटलं आहे..