राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात आल आहे. मात्र या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी येणार होते.. पण काही कारणास्तव त्यांचा दौरा होऊ शकला नाही.. मात्र आता सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 20 किंवा 21 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्यासाठी स्वतः आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान भव्य शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.. दरम्यान ते चौथ्यांदा मुक्ताईनगरला येणार आहेत. फक्त अडीच वर्षाच्या काळात मुक्ताईनगर चार वेळेस येणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे आता या दौऱ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.