राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विविध मतदार संघाची चाचणी केली जात आहे.. अशातच आता अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे..
नुकताच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.. विधानसभा निवडणुकीचे बिगोलो असतास मनसेसह सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी किंवा लढवू नये, याचा आढावा सध्या राज ठाकरेंकडून घेतला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून सातत्याने अमित ठाकरेंच्या निवडणुका लढवण्याबद्दलची मागणी केली जात आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. आता अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखली. राज यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माहिम मतदारसंघातून ते लढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे..