राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता ठाकरे गट ऍक्शन मोडवर आला असून काल मातोश्रीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यास सुरुवात झाली..त्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि काही वरिष्ठही सहभागी झाले होते. या बैठकीत विद्यामान 15 आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यमान आमदारांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना AB फॉर्म दिले जातील, असेही या बैठकीत सांगण्यात आले. तसेचं त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येकासोबत चर्चा केली. त्यांनी मतदारसंघातील काही अडचणी आहेत का? याबद्दलही त्यांनी जाणून घेतले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते या बैठकीला अनुपस्थितीत होते..
. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांनीही या सर्व आमदारांना मार्गदर्शन करीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.