राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना उद्धव ठाकरे गट एक्शन मोडवर आला असून महायुतीला त्यांनी चांगलाच डबल धमाका दिला आहे. निवडणुकीआधीच महायुतीला धक्का बसला असून कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील आज स्वगृही ठाकरे गटात परतत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच राजन तेली यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला होता.. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष म्हणजे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे. धर्मेंद्र दुसरीकडे ठाकरे गटात सांगोल्यातून अजित दादा गटाचे दीपक आबा साळुंखे हे आज संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रवेश करणार आहेत. तर भाजपच्या राजन तेली यांचा 5 वाजता होणार पक्षप्रवेश केला जाणार आहे. तसेच चिंचवड येथील अजित दादा गटाचे मोरेश्वर बोन्डवे यांचा 6 वाजता प्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. मात्र सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेतून दीपक आबा साळुंखे उतरणार मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक साळुंखे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची घोषणा होतास आता ठाकरे गदात इन्कमिंग व्हायला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे महायुतीला चांगलाच दणका बसणार आहे.