राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असताना राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत 110 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले त्यामुळे अवघ्या काही तासातच भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी महायुतीतील प्रत्येक पक्षांकडून दोन टप्प्यात यादी जाहीर केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
महायुतीतील जागा वाटपामधील आधी भाजप की शिंदे गटाची यादी जाहीर होणार याबद्दल बोलताना यावेळी संजय शिरसाट यांनी भाजप यांच्याकडे जास्त जागा असल्याने त्यांची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची आमची यादी दोन दिवसात जाहीर केली जाईल, असे त्यांनी म्हटले. दरम्यान महायुतीतील काही जागांवर चर्चा करण्यासाठी माहितीतील नेते दिल्लीला जाणार असल्यासही त्यांनी सांगितलं.
महायुतीतील उमेदवारी यादी जाहीर करण्याबद्दल या पक्षातील तिन्हीही नेत्यांची चर्चा झाली आहे. येत्या 8 दिवसानंतर प्रत्येक नेत्यांचे दौरे ठरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसात यादी जाहीर केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.