राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदपवारॲक्शन मोडवर आले आहेत.. आगामी विधानसभेला शरद पवारांनी अजित पवारासोबत गेलेल्या धनंजय मुंडे च्या परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलय. या मतदारसंघात 2024 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या विरोधात मविआ तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.दरम्यान जो उमेदवार पवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे परळीची लढत ही धनंजय मुंडेंसाठी अवघड होण्याची शक्यता आहे…
गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची आणि लक्षवेधी निवडणूक ठरली ती बीड लोकसभा मतदारसंघाची..त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Sharadchandra Pawar NCP) बजरंग सोनवणेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे, येथील मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवाराचं गणित चांगलंच जुळलं होतं.. या यशानंतर आता विधानसभेच्या रिंगणात ही शरद पवार जोमाने मैदान उतरले असून धनंजय मुंडे आता त्यांच्या रडारवर आहेत. मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधान मतदारसंघात शरद पवारांनी नवा डाव टाकला आहे.
दरम्यान याआधी 2009 साली गोपीनाथ मुंडे लोकसभेत गेल्यानंतर पंकजा मुंडेंकडे परळीचं नेतृत्व आलं. पंकजा मुंडे 2009 आणि 2014 दोन टर्म परळीच्या आमदार राहिल्या. 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत परळीत हायहोल्टेज सामना रंगला. 2019 मध्ये पंकजा मुंडेंना पराभूत करुन प्रथमच धनंजय मुंडे विजयी झाले. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे शरद पवारांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.