राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असताना आता मुक्ताईनगर मतदारसंघात राजकीय वातावरण चिघळत चाललं आहे. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे..खडसेंच दुसरे नाव भूलथापा कारण ते सकाळी कोणत्या पक्षात तर संध्याकाळी कोणत्या पक्षात असतात..खडसे म्हणजे आता जोक झाला असल्याची विखारी टीका मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी नव्हे तर स्वतःच्या मुलीसाठी फिरत आहेत..खडसे आता कोणाच्याही घरात घुसायला लागले आहे खडसेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे.. त्यांचे कार्य राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येयधोरणात विरोधात असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुक्ताईनगरची जनता एकनाथ खडसेना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे..
गेल्या 30 वर्षांपासून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात राजकीय हाडवैर सर्वश्रूत आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.मुक्ताईनगर मधील मतदार एकनाथ खडसेंना आता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे हे पक्षाचे नव्हे तर स्वतःच्या फॅमिली चे काम करतात .. असा हल्लाबोल आमदार पाटील यांनी लगावला.