राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुक्ताईनगर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा हे निश्चित मानला जात आहे याबाबत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या उमेदवारी बाबत बोलताना भाजप बाबत प्रतिक्रिया व्यक्त केले आहे, भाजपाचा दावा करणं गैर नाही, लोकसभेच्या वेळी मीदेखील दावा केला होता , निवडणूक लढवण्यासंदर्भात व पक्ष वाढवण्या संदर्भात दावा करणे गैर नाही मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी भाजपचा दावा हा विषय नव्हता असे देखील स्पष्टीकरण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्यासही ते बोलले..
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करतो , मी शिवसेनेच्या व बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे. काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले मात्र मी सोडले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझा नेता मानलेला आहे , एकनाथ शिंदे जो मला निर्णय देतील तो मला मान्य असेल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.. दरम्यान गेल्या ३५ वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघातून भाजपलाच उमेदवारी मिळावी, म्हणून मतदार संघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत.. आता भाजप चा मुक्ताईनगर मतदार संघावर केलेला दावा खोल ठरतो का ? हे चित्र काही तासात स्पष्ट होणार आहे.
. अद्याप मुक्ताईनगर मतदार संघातील महायुतीचा उमेदवार ठरला नाही. मात्र विधानसभेसाठी भाजपतर्फे या मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे चित्र असले, तरी उमेदवारी कोणाला मिळणार? हे अद्याप अधिकृत जाहीर झालेले नाही.