राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून जळगाव ग्रामीण मतदार संघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे..शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी गेली पाच वर्षापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे तयारी करीत आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असल्याने त्यांची अडचण झाली आहे.. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यास मुंबईला रवाना झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे..
यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, जळगाव ग्रामीण मतदार संघ हा गुलाबराव नावाचाच मतदारसंघ असणार असून कोणत्या ना कोणत्या गुलाबारावाची टक्कर होणारचं.. मात्र जनता ज्याला आशीर्वाद देईल तो निर्णय आम्ही मान्य करू असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाला जळगाव ग्रामीणची जागा मिळाली नाही तर गुलाबराव देवकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून लढतील का? अशा स्वरूपाच्या चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगल्या आहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आता गुलाबराव देवकर कोणत्या पक्षातून लढतात याची उत्सुकता वाढली आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आगामी विधानसभेसाठी आमचा आमच्या जनतेवर विश्वास आहे राजकारणात व्यक्तिगत दुश्मन कोणी नाही…. त्यामुळे जनता ज्याला आशीर्वाद देईल तो निर्णय आम्ही मान्य करू असे ते म्हणाले… या मतदारसंघात होणारी टक्कर ही काटेंशी नाही तर फुलांचीच होणार असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. त्या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकिटासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र आहे.