राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले.. यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, लोकांशी असलेला संपर्क आणि लोकांशी व्यक्तिगत काम हेच आमचे रिपोर्ट कार्ड.. असल्याचं त्यांनी सांगितलं.
महायती सरकारने केलेली प्रमुख कामे ही लोकांच्या डोळ्यासमोर असतात.. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम केले त्या ठिकाणी पत्रिका वाटप करून काय काय काम केले हे त्या पत्रिकाच्या माध्यमातून जनतेला स्पष्ट केला आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकशाहीनुसार कोणालाही मैदानात उतरण्याचा अधिकार आहे.. असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी रिपोर्ट कार्ड सादर करतेवेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही आमच्या दोन-सव्वा दोन वर्षाच्या कामाचं रिपोर्ट कार्ड आपल्यासमोर मांडलं आहे. हे कार्ड मांडण्यासाठी हिंमत लागते. पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात सर्व महत्वाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती. ते आम्ही सर्व पूर्ण केल्याचं त्यांनी म्हटलं.