राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊनही अद्याप महायुतीच जागावाटप जाहीर झालेल नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीची काल रात्री दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा केली. जागावाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. यात भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटा 75 ते 80 जागा लढेल. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 ते 60 जागा लढणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल तरीही काही जागांवर महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे. मात्र आता राज्य पातळीवर हा तिढा सोडवा अशा सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांना दिल्या आहेत.
दरम्यान बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत केलं जाईल. तुम्ही काळजी करू नका… तिघांची बैठक झाली आहे काळजी करू नका. आम्ही तिघे एकत्रित प्रेस घेऊ कुणाकुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते स्पष्ट करू. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही अडचण नाहीये, असं अजित पवार म्हणाले.
दुसरीकडे राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. विदर्भातील जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून नुकती शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे.