राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून जळगाव ग्रामीणमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.निवडणुकीच्या तोंडावरच जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांनी ही शिंदे गटाला रामराम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.. जळगाव ग्रामीण मधील म्हसावद बोरणार गटातील उमदे नेतृत्व म्हणून नरेंद्र सोनवणे यांच्याकडे बघितले जाते..त्यांच्या प्रवेशामुळे नक्कीच या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची ताकद वाढली आहे.
दरम्यान त्यांच्या प्रवेशावेळी माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांचे सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..नरेंद्र सोनवणे यांच्यासोबत शुभम सोनवणे,वाल्मीक पाटील, पप्पू सोनवणे, मंगलसिंग सोनवणे, प्रकाश काळे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच म्हसावद बोरनार गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी सोपी नाही असा अंदाज राजकीय विश्लेषकानी बांधला आहे.