राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे अंतिम टप्प्यात काम आल असून मुख्यमंत्रीपदावरून आता दोन्हीमध्ये चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मदत व पुनर्वसन अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीच्या पदावरून चढाओढ असल्याचं वक्तव्य केल असून मुख्यमंत्री पदासाठी ते पायाला घुंगरू बांधून बसलेत, असेही ते म्हणाले आहे. तसेच पुढील काळामध्ये त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत झालेले युद्ध हे आपल्याला दिसून येइल, असेही त्यांनी म्हटले आहे..
दरम्यान महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काही नेते असे आहेत की ते मुख्यमंत्री पदासाठी घुंगरू बांधून बसलेले आहेत…असे तीन ते चार मुख्यमंत्री हे काँग्रेसमध्ये आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ही सुद्धा दोन ते तीन नेते जे आहेत त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली आहे.. मात्र महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री पदासाठी दुसरा चेहरा कुठलाही नाही हा समाज शिवसेनेमध्ये सगळ्या शिवसैनिकांचा आहे.. असे त्यांनी म्हटले आहे..
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.त्यामुळे त्यावरून त्यांच्यामध्ये असलेले वाद आता हळूहळू आपल्यासमोर येतील, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.