राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच राज्यातील विविध छोटे पक्ष तसंच संघटनांच्या वतीनं ‘परिवर्तन महाशक्ती’ म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीवरून आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी हल्लाबोल चढवला आहे… कितीही आघाड्या आल्या तरी महायुतीच्या सरकारच्या कामावरच महाराष्ट्रातील जनता ही समाधी असल्याचे सांगत त्यांनी टोला लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्या दिसतील… यामध्ये तिसरी आघाडी चौथी आघाडी असे अनेक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील… मात्र काहीही झालं तरी महिलांचा आणि शेतकऱ्यांचा हीत जोपासणार हेमहायुतीच सरकार आहे. असं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं.
या तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह इतर नेत्यांचाही समावेश आहे.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात या महायुतीविरोधात दंड थोपटले आहेत.