राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून नवीन पक्षाच्या चिन्हामुळे शरद पवार गटाला विधानसभेत ताप होणार आहे..न्यू राष्ट्रीय समाज पक्ष पिपाणी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे त्याचे सरचिटणीस रामचंद्र घुटकडे यांनी पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हेच चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पक्ष घेणार असल्यामुळे शरद पवारांच्या अडचणी वाढणार आहेत.. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीतही शरद पवारांच्या पिपाणीची तुतारी वाजणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाचा फटका शरद पवार गटाला बसला होता.. त्यामुळे हे चिन्ह गोठवण्यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती ही केली होती, मात्र ती आयोगाने विनंती अमान्य केली.. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे… दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवारांचे टेन्शन वाढले असल्याचा दिसून येत आहे कारण न्यू राष्ट्रीय समाज पक्ष पिपाणी चिन्ह घेऊन रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्या पक्षाकडून पिपाणी चिन्हाचा आग्रा धरला जाणार असल्याने लोकसभेनंतर विधानसभेला ही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणार असल्याची चर्चा आहे..
दरम्यान गेल्या तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत.. 20 नोव्हेंबरला मतदान परवडणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे..