राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत.. अशातच विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सरकारवर केले जात आहेत.. दरम्यान नुकतीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलां स्तगती मिळाल्याची चर्चा सुरू होती यावर आता सरकारच्या वतीने महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलयं..सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही कायमस्वरुपी सुरु राहणारी योजना आहे.. या योजनेला महिलांचा प्रतिसाद बघून विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केला आहे.
शासनाने महाराष्ट्रातील पात्र बहिणींना या योजनेचा लाभ दिला.. यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी चा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला होता.. त्यानंतर चार ऑक्टोबरला देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.. आता यापुढील हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणतेही चुकीच्या माहितीला बळी पडू नका असेही त्यांनी सांगितल आहे..
याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटर म्हटलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार… या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे…या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र बहिणींना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा ही केले आहेत.. त्यामुळे या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील बहिणींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!