राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड चा राजा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे..नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर आता त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात सामील होत काकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष निवडणूक लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे… त्यामुळे आता काका पुतण्या संघर्षानंतर आगामी विधानसभेत काका पुतणी असा पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार आहेत.
सिंदखेडचा राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे यांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे गायत्री शिंगणे यांच्या इशाऱ्यानंतर शरद पवार काय करणार? याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतणी असा संघर्ष दिसून येणार आहे..पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा प्रवेश देणार नाही. त्यापेक्षा नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊ, असे शरद पवार वारंवार सांगत होते..
लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या गटात विधानसभेसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. अशातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून अजित पवार गटाला धक्का दिला आहे… आता सिंदखेड चा राजा मतदार संघात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.