राजमुद्रा : जळगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.. मात्र पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..पहिल्या यादीमध्ये आमदार भोळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांचे तिकीट कापले जाणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या,मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा मधील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात आपली लॉगिन तिकीट मिळवण्यासाठी सुरू ठेवली होती मात्र इच्छुकांच्या उमेदवारीवर अखेर पाणी फेरण्याचा पाहायला मिळत आहे.
जळगाव विधानसभेबाबत उमेदवारी कोणाला मिळणार ? सर्वात अगोदर राजमुद्राच्या माध्यमातून वृत्त छापण्यात आले होते. विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळणार याबाबत राजमुद्रा वृत्त प्रकाशित केले होते अखेर राजमुद्राचे वृत्त खरे ठरले आहे. राजमुद्रा नेहमीच वाचकांच्या विश्वासार्ह बातम्या प्रकाशित करत आला आहे त्याहून अधिक राजकीय सोर्स अधिक असल्याने राजकीय क्षेत्रातील अधिक बातम्या देण्यासाठी राजमुद्रा नेहमी अग्रेसर असते आपल्या आजूबाजूच्या घडामोडी नेहमी अपडेट देण्यासाठी आगामी विधानसभेच्या निमित्ताने राजमुद्राची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.