राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आचारसंहिता लागू झाली.. त्यामुळे धुळे मतदारसंघातील जागा कुणाला सुटणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली होती.. मात्र आता सस्पेन्स संपला असून धुळे मतदार संघातून यंदा भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे..
विधानसभेच्या आचारसंहितेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा कुठल्या पक्षाला सुटते तसेच इतर पक्षाकडून रिंगणातील उमेदवार कोण असणार याची उत्सुकता ताणली गेली.. मात्र नुकतीच भाजपने पहिल्या 99 उमेदवारांची घोषणा केली आहे..असल्यामुळे आहे..या यादीत भाजपने शिवसेनेच्या पाच जागांवर उमेदवार दिले असून विद्यमान आमदारांच तिकीट कापलं आहे. दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे मतदार संघातून 2019 ला शिवसनेनेचे हिलाल माळी हे उमेदवार होते. पण याच मतदारसंघातून भाजपकडून यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपने यंदा उमेदवारी दिलीये. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.