राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.. अशातच मुक्ताईनगर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या मतदारसंघात आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना अखेर शरद पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. महायुती कडून मुक्ताईनगरची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आहे मात्र अद्याप पर्यंत शिंदे गटाच्या उमेदवारा जाहीर झालेल्या नाहीत मात्र शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची उमेदवारी मात्र जाहीर झालेली आहे.
मुक्ताईनगर मध्ये शिंदे गटविरुद्ध शरद पवार गट अशी राजकीय लढाई होताना पाहायला मिळणार आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मुक्ताईनगरच्या विधानसभेच्या मैदानात आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक राजकीयवाद मुक्ताईनगर मध्ये पाहायला मिळाले आहेत , गेल्या विधानसभेला रोहिणी खडसे या भाजपकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात होत्या, त्यांचा अवघ्या काही मतांनी चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता.
मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरत राष्ट्रवादीमध्ये काम करणे पसंद केले राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष पदासह त्यांना आता विधानसभेचे देखील मुक्ताईनगर विधानसभेमध्ये उमेदवारी दिली आहे.
अवघ्या काही मताने झालेला पराभव राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा चांगलाच जिव्हारी लागला आहे.. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये मोठा राजकीय संघर्ष मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे.. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील मोठा राजकीय संघर्ष मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करावा लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये रोहिणी कडचे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे..राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बाजूवर देखील मुक्ताईनगर मध्ये रोहिणी खडसे यांनी चांगलाच भर दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणाला यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.