जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी करणारे करणाऱ्या आरोपींना जाळ्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात एक मोटर सायकल चोरीस गेली होती. चेतन योगेश पाटील रा. शनी मंदिर चौक, पारोळा याला चोरीच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित आरोपी चेतन पाटील व त्याचा साथीदार सागर रवींद्र पाटील या दोघांकडून दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, स. फौ. अशोक महाजन, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, विनायक पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.