राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.. अशातच आता ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.. या यादीत माजी आमदार अनिल गोटे यांचं नाव ठाकरे गटाकडून पहिल्या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे अनिल गोटे यांच्यासारखा उमेदवार आल्यास ठाकरे गटाची बाजू धुळे शहरात भक्कम होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
याआधी अनिल गोटे यांनी तीन वेळा धुळे विधानसभेचे नेतृत्व केले आहे.. त्यांनी स्वतःची संघटना असलेल्या लोकसंग्राम या संघटने कडून दोन वेळा तर भारतीय जनता पार्टी कडून एक वेळा असे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत..दरम्यान याआधी भाजप मध्ये असताना अंतर्गत विरोधाचा मोठ्या प्रमाणात सामना माजी आमदार गोटे यांना करावे लागला आहे.. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध मोठा संघर्ष पेटणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी कडून अनुप अग्रवाल यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. संघटनात्मक बळावर तसेच हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होऊन भाजप धुळे शहराची जागा राखू शकते,असा देखील अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत असताना बघायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम कडून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे..फारुख शहा यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा दावा केला आहे मात्र प्रत्यक्षात शहा यांच्याबाबत धुळेकर काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.