राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटप अंतिम टप्प्यात आला असून काहींच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. अशातच आता भाजप नेते निलेश राणे 23 ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळाडमधून भाजपच्या कमळ या पक्ष चिन्हाऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी दाट शक्यता आहे. जर निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर ठाकरे गटाचे वैभव नाईक हे दोघे कुडाळमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे
दरम्यान विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची यादी अजून जाहीर झाली नसून या यादीत कोणाकोणाच्या नावाची वर्णी लागते याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.अशातच भाजप नेते नितेश राणे विधानसभा लढण्यास इच्छुक असून ती लवकरच धनुष्यबाण हाती घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.. या सिंधुदुर्गात एकूण ३ जागा आहेत त्यापैकी २ जागा भाजप आणि एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार अशी चर्चा आहे.त्यामुळे ही जागा आता कोणाला सुटणार हे पहावं लागणार आहे.