राजमुद्रा : विधानसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असताना राजकीय पक्षाकडून त्यांची उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.. अशातच आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून शिंदे गटाकडून आज साधारण ३० ते ४० जणांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या २४ ॲाक्टोबरला. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान नुकतीच भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत नातेवाईकांना अधिक उमेदवारी दिली आहे..
भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून नागपूर द. पश्चिमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.दरम्यान आता महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून कोणा कोणाला उमेदवारी मिळणार याचे उत्तर राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचले आहे.