राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 288 मतदार संघासाठी विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडणार आहे..तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षाकडून कोणाला निवडणुकीत रिंगणात उतरायचे याची तयारी सुरू झाली आहे.. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. नुकतीच भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.. या यादीत विशेष म्हणजे खानदेशातील दहा उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.यामध्ये मंत्री गिरीश महाजन,डॉक्टर विजयकुमार गावित,माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासह विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना रावेर मतदारसंघात अमोल जावळे व धुळे शहरातून अनुप अग्रवाल या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानदेशात भाजपला मिळणाऱ्या दहा जागांची उमेदवारी पक्षाने मात्र कायम ठेवली आहे..या दहा जागांपैकी दोन जागांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून ते या विधानसभेत बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खानदेशातील उमेदवार –
शहादा- राजेश उदयसिंग पाडवी
रावेर -अमोल जावळे
धुळे -अनुप अग्रवाल
नंदुरबार- विजयकुमार गावित
जामनेर- गिरीश महाजन
भुसावळ – संजय सावकारे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जळगाव शहर – सुरेश भोळे
शिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर- काशीराम पावरा