राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आता महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडी कडूनही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.. यामध्ये रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडी कडून प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्यपूर्ण जनसंपर्क तसेच केलेल्या विकास कामांच्या जोरावर अनिल चौधरी यांची उमेदवारी जाहीर करत असल्याची माहिती प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी दिली आहे.
आज आयोजित परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडी मधून गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांची चाचणी सुरू होती..यामध्ये नेमकं किती उमेदवार महाराष्ट्रात उभे करावे याबाबत वरिष्ठ पातळीवर अनेक बैठका झाल्या होत्या मात्र अखेर भाजपाच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर होताच , परिवर्तन महाशक्तीने देखील आपले उमेदवार राज्यभरात जाहीर केले आहे.
रावेर यावल मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचे चांगल्या प्रमाणात संघटन आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी हे गेल्या अनेक वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये काम करीत आहे,आपल्या संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर त्यांनी संघटना अधिक बळकट करण्याचे काम रावेर – यावल भागात केले आहे.
तर भाजपाकडून अमोल जावळे यांची नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे भारतीय जनता पार्टी कडून प्रथमच अमोल जावळे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांच्या ऐवजी अमोल खडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी रावेर यावल मधील एक गट सक्रिय झाला होता.. मात्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना लोकसभेत संधी देण्यात आल्याने अमोल जावळे यांना आगामी विधानसभेचा शब्द पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आला होता. अखेरीस विधानसभेमध्ये पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अमोल जावळे यांना भाजपकडून रावेर यावल विधानसभेमध्ये उमेदवारीची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेसकडून धनंजय चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. अद्याप पर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यात जाहीर झालेले नाहीत मात्र धनंजय चौधरी यांनाच काँग्रेस कडून तिकीट मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आले आहे. विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र असलेले धनंजय चौधरी हे देखील रावेर यावल विधानसभेच्या मैदानात आहे,यामुळे रावेर यावल विधानसभा मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होणार हे निश्चित आहे.