राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रसिखेच सुरु आहे…. शाताच राज्यात नव्याने स्थापन झालेल्या “परिवर्तन महाशक्ती” या तिसऱ्या आघाडीने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची देखील उमेदवारी या यादीतून जाहीर करण्यात आली आहे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच छत्रपती संभाजीराजे (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली. ज्याला ‘परिवर्तन महाशक्ती’ (parivartan mahashakti) असं नाव देण्यात आलं आहे. याच ‘परिवर्तन महाशक्ती’ची आज एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्षाकडून चार उमेदवारांची घोषणा
अचलपूर मतदारसंघ –बच्चू कडू
रावेर यावल मतदार संघ –अनिल छबिलदास चौधरी
चांदवड विधानसभा मतदारसंघ – गणेश निंबाळकर
देगलूर बिलोली मतदारसंघ -आमदार सुभाष साबणे
संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या दोन उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ऐरोली येथून अंकुश कदम आणि हदगाव हिमायतनगर येथून माधव देवसरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य समितीकडून हिंगोली मतदारसंघातून गोविंदराव भवर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच स्वतंत्र भारत पक्षाकडून राजुरा येथून वामन चटप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी शिरोळ आणि मिरज या दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. यासाठी राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.