राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर मुक्ताईनगर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते शिवसेना मेळावा पार पडला.. दरम्यान यावेळी त्यांनी मुक्ताईचे दर्शन घेतले आहे..यावेळी बळीराजाला सुखी ठेव ,सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, शेतकऱ्यांचें नुकसान झाल आहे.सर्व गोरगरिबांचे चांगले दिवस येऊ दे ,हे मुक्ताईला साकडे घातले आहे.
यावेळी ते म्हटले, गेल्या दोन वर्षात एवढी प्रकल्प आपण केली उद्योग आणलेत कल्याणकारी योजना आणल्यात,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणल्या की या कामाची तुलना महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि दोन सव्वा दोन वर्ष महायुतीचे त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता कामाची पोच पावती दिल्याशिवाय राहणार नाही आई मुक्ताई चरणी प्रार्थना.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला बिन शर्थ पाठिंबा जाहीर केला असून यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,महायुतीत येणाऱ्यांच्या सर्वांचेच नेहमीच स्वागत असणार आहे..