राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर आचारसंहिता लागू झाली.. त्यामुळे धुळे मतदारसंघातील जागा कुणाला सुटणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली होती.. मात्र आता सस्पेन्स संपला असून धर्मयोद्धा म्हणून शहरभर ओळखल्या जाणाऱ्या अनुप अग्रवाल यांना धुळे मतदार संघातून यंदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरभरात चौका चौकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच अनुप अग्रवाल यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला…हा जल्लोष त्यांच्या विजयाची संकेत देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे..
दरम्यान विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने अनुभयास निवडून येणार अशी ग्वाही भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली.. विधानसभा निवडणुकीत अनुप अग्रवाल यांना निवडून आणणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार असून धुळ्याचे आमदार म्हणून अनुप अग्रवालच निवडून येतील.. कारण त्यांच्या विजयासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचीग्वाही माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकी धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील धुळे शहर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महायुतीमध्ये धुळ्याची जागा शिंदे गटाला सुटणार की भाजपला याची उत्सुकता ताणली गेली होती.. अखेर भारतीय जनता पक्षाकडून अनुप अग्रवाल यांचे तिकीट जाहीर होताचं धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आल.