राजमुद्रा : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत बैठकींचा सपाटा लावला आहे.. या पार्श्वभूमीवरच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील विधानसभा जागांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चानां उधाण आलं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष हे जोमाने कामाला लागले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागावर चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ११.३० च्या दरम्यान भेट घेतली . या बैठकीला धनजय मुंडे देखील उपस्थित होते.दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे सध्या बीडमधील वातावरण काय, परळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न काय याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबद्दलही चर्चा करण्यात आली. दरम्यान उमेदवार नसताना सुद्धा भाजपा नेत्या पंकजा मुंडे भाजप यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.