राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं. या आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटांन सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती..मागील काही महिन्यापासून याची सुनावणी पुढे ढकलली जात होती.. मात्र आज त्यावर सुनावणी झाली.. या सुनावणीत अजित पवार गटाकडेच राष्ट्रवादीचे चिन्ह राहणार असल्याच सुप्रीम कोर्टाने सांगितलं.. त्यामुळे शरद पवार यांनी केलेली याचिका फेटाळली असल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळाच्याऐवजी दुसऱ चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आलेली होती ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षातर्फे दाखल याचिका फेटाळली आहे. यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही जोमाने मैदानात उतरले असून यावेळी बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकत्याच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक अशा तारखा जाहीर केल्या आहेत, यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यावर मतदान पार पडणार आहे तर निकाल लगेच 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे..