राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत.. अशातच आता महाविकास आघाडीत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागेवरून जोरदार रसिखेच सुरू असून जागा वाटपाचा तिढा सुटणार काही थोड्या व्यास समोर येणार आहे कारण आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे.. अशातच आता ठाकरे गटांच्या 53 शिलेदारांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर आली आहे..
गुरूवारपासून विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्या. त्यानंतर तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून आतापर्यंत 53 जणाची उमेदवारी निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे.. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहे. या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर निवडणुकीसंबंधी या उमेदवारांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने एकूण आतापर्यंत 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या यादीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कोणाचा पत्ता कट होणार किंवा कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचले आहे. आज आघाडीचे समन्वयक बाळासाहेब थोरात आणि शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची दुपारी भेट घेणार आहेत. त्यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.