राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं असल तरी जळगाव शहर विधानसभेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये राजकीय तिढा कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर थोड्यावेळापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते श्रीराम पाटील, सुनील महाजन, गोपाल दर्जी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.
महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या माध्यमातून माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. याबाबत सविस्तर चर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी सुनील महाजन यांनी केली आहे याबाबत काही तासांमध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे. आता माजी महापौर जयश्री महाजन यांच्या बाबत शरद पवार नेमकं काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव विधानसभा राखायची असेल तर तुतारी चिन्हा शिवाय पर्याय नाही असा अट्टाहास शरद पवारांकडे नेत्यांनी केला आहे. या भेटीवेळी मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून तसेच मराठा दलित मुस्लिम असे गणित महाविकास आघाडीला पोषक असल्याचा अंदाज शरद पवारांकडे कडे देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा दलित मुस्लिम मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे वळल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले तोच कयास बांधून जळगाव शहरात तुतारी चा उमेदवार विजयी होऊ शकतो असे गणित आखली जात आहे. यावर आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.